बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर जी जी चिटणीस स्कूल आयोजित श्री छत्रपती शिवाजी अनगोळ टिळकवाडी शहापूर क्लस्टरच्या अथलेटिक क्रीडा स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 115 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, तर बालिका आदर्श शाळेने 112 गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अथलेटिकमध्ये मुलांच्या गटात संत मीरा शाळेने 66 गुण तर मुलींच्यात बालिका आदर्श शाळेने 112 गुणासह विजेतेपद मिळविले.
वैयक्तिक गटात मुलांच्या संत मीरा शाळेच्या अनिरुद्ध हलगेकर तर मुलींच्यात शिवानी शेसल प्रत्येकी 15 गुण घेत वैयक्तिक विजेते ठरले.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे ऍड. श्रीकांत कांबळे, ऍड. संतोष बागांनावर क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे,
शाळेचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, मुख्याध्यापिका नवीना शेट्टीगार, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, स्पर्धा सचिव जयसिंग धनाजी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, बापू देसाई या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी क्रिडाशिक्षक सिल्विया डिलीमा, सुनिता जाधव, प्रविण पाटील, चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, अशोक बुडवी, शीला सानिकोप,अर्जुन भेकने, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, रामलिंग परीट, देवकुमार मंगण्णाकर, सोमशेखर हुद्दार, शंकर कोलकार, अनिल मुगळीकर, मथ्यू लोबोसह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक डिचोलकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta