Monday , September 21 2026
Breaking News

जन्मदात्या पित्याकडून मुलाची सुपारी देऊन हत्या

Spread the love

 

बेळगाव : दारूचे व्यसन जडल्याने कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा बापानेच सुपारी देऊन भीषण खून केल्याची धक्कादायक घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे.

खून झालेल्या युवकाचे नांव संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय 38, रा. बैलहोंगल) असे असून मुरगोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मंजुनाथ होंगल व अडवेश बोळतीन (दोघेही रा. हिरेकोप्प के. एम., ता. सौंदत्ती) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश हा दारूच्या नशेत घरी येऊन कुटुंबीयांना त्रास देत होता या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याला ठार मारण्याची सुपारी दोघा जणांना दिली. त्या दोघांनी गेल्या 20 ऑगस्ट रोजी अंकलगी येथे संगमेशला दारू पाजून मोटर सायकलवरून कुटरनट्टी डोंगरावर नेले. त्यानंतर डोंगरावर दगडाने ठेचून संगमेशचा खून करण्यात आला. याप्रकरणी मयत संगमेशचे वडील मारुतेप्पा तिगडी यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *