
बेळगाव : तुकाराम को-ऑप. बँकेने गत आर्थिक वर्षात ६७ लाख ७ हजार ७७० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. संस्थेची ७२ वी सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी शुक्रवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, संस्थेकडे ८, ९३६ सभासद आहेत. शेअर भांडवल १,३९,६७,६०० रुपये, राखीव निधी ८,०९,२७,८७६ रुपये, ठेवी ५५,३१,०१, ३५९ रुपये, कर्ज वाटप ३५,९०,८७,८९४ रुपये, गुंतवणूक २७,९१,५१,६५५ रुपये, खेळते भांडवल ६८,५१, ४१, ८४२ रुपये असून संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. आरबीआयच्या अनेक अटींमुळे विविध उपक्रम राबवताना बंधने येत आहेत, असे त्यांनी सांगितले. सभासदांच्या हितासाठी आम्ही आजतागायत अनेक उपक्रम राबवले आहेत. नेत्रदान करणाऱ्यांच्या वारसाला अडीच हजार, चष्म्यासाठी एक हजार आणि दातांच्या कवळीसाठी दीड हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मरगाळे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक अनंत जांगळे, राजेंद्र पवार, राजू मरवे, मोहन कंग्राळकर, मदन बामणे, प्रवीण जाधव, वंदना धामणेकर, महादेव सोंगाडी, सीईओ परिंद जाधव आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta