बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली यामध्ये पंधरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत शेतकरी बचाव पॅनेलने मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे हातात ठेवली आणि निर्विवाद वर्चस्व मिळवले.
शेतकरी बचाव गट विजयी उमेदवार सामान्य गटात चार जागांवर विजय मिळवला त्यात आर. आय. पाटील, शिवाजी कुट्रे,
सिधप्पा टूमरी, जोतिबा आंबोळकर यांचा समावेश तर एस. टी. गटातून लक्ष्मण नाईक यांनीही विजय प्राप्त केला आहे तर ओ बी सी ब गटातून तानाजी पाटील यांनी भक्कम विजय मिळवला. सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर, बिगर ऊस उत्पादक ड गट मधून बाबासाहेब भेकणे. या शिवाय महिला गटातून वनिता अगसगेकर, ओ बी सी ए गटातून बसवराज गानगेर यांनी विजय मिळवला.
पोतदार गटातून सामान्य गटात अविनाश पोतदार, बाबुराव पिंगट आणि बसवंत मायाणाचे यांनी तर महिलामधून वसुधा म्हाळोजी यांनी एस सी गटातून केवळ दोन मताच्या फरकानी चेतक कांबळे यांनी विजय मिळवला.
Belgaum Varta Belgaum Varta