बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७/०८/२०२३ रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. व अहवाल साली बँकेच्या मयत झालेल्या सभासद व हितचिंतक यांना चिरशांती लाभावी म्हणून संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वर्गाने दोन मिनिटे शांतता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी अहवाल वाचन केले व बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रविण पाटील यांनी २८/०८/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले. सभासदांनी एक मताने इतिवृत्तास मान्यता दिली.
बँकेचे सी. ई.ओ. श्री. परींद जाधव यांनी ताळेबंद पत्रक सादर केले. शाखा प्रबंधक श्री. सागर हावळाणाचे यांनी नफा-तोटा पत्रक सादर केले व सिनियर असिस्टंट श्री. विजय बा. पाटील यांनी सन २०२३- २०२४ सालाचे अंदाजपत्रक सादर केले. बँकेचे आकौंटंट श्री. संदीप मोरे यांनी लेखा परिक्षण अहवालाचे वाचन केले. यावर सभासदांनी चर्चा करून व मौलीक सुचना करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
बँकेचे ज्येष्ठ सभासद श्री. शिवाजी तारीहाळकर, श्री देवकुमार बिर्जे, श्री. अनंत लाड, श्री. महादेव मेणसे, मारूती डोळेकर, रमाकांत बाळेकुंद्री आदिनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व मौलीक सुचना मांडल्या. सदर सुचनांची नोंद घेण्यात आली. चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन सभासदांनी दिलेले सहकार्य व दाखविलेला विश्वास याबद्दल समाधान व्यक्त केले.
बँकेचे संचालक श्री. मोहन कंग्राळकर यांनी आभार प्रदर्शन केले. या सभेस संचालक श्री. विजय पाटील, श्री. अनंत जांगळे, श्री संजय बाळेकुंद्री, श्री. मदन बामणे, श्री. प्रविण जाधव, श्री. महादेव सोंगाडी, श्री. राजू मरवे, श्री. सुनिल आनंदाचे, सौ. वंदना अ. धामणेकर व सौ. पल्लवी सरनोबत तसेच सभासद पुंडलीक मोरे, गोपाळ हंडे, लक्ष्मण गणू मेणसे, गजानन पवार, मिलिंद अनगोळकर, बाळासाहेब फगरे, महेंद्र माने, विनोद आंबेवाडीकर, संदीप मुतकेकर, सतीश देसाई आदि मान्यवर सभासद उपस्थित होते. बँकेचे मॅनेजर श्री. संकोच कुंदगोळकर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta