बेळगाव : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील पिके करपायला लागलेली आहेत. बटाटा, भात, सोयाबीन, भुईमूग, मका, रताळी अशी सर्व पिके पावसाळाअभावी मान टाकलेली आहे. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर बळीराजा बसला असून सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिना हा कोरडा गेल्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंप सेट आहे त्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याकारणाने देखील शेती पिकाला पाणीपुरवठा करणे कठीण होऊन बसले आहे. शेतकऱ्याची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चलवेनहट्टी, अगसगे, हंदीगनूर, कडोली, केदनुर या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta