बेळगाव : कर्नाटक कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या कर्नाटक कायदा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदे व महंत यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
नयानगर, हुबळी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात दि. 26 व 27 ऑगस्ट रोजी या 9 व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशातून यामध्ये 35 गटांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक व द्वितीय स्तरावर संघांची स्पर्धात्मक चाचणी घेतल्यानंतर त्यांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. यामध्ये रामय्या महाविद्यालय बेंगळूर येथील एलएलबी प्रथम वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी मैत्रेयी संतोष शिंदे व महन्त यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद मिळविले. विजेतेपद बेंगळुरू येथील के. एल. ई. महाविद्यलयाने पटकावले. मैत्रेयी शिंदे ही हनुमान नगर येथील कॅप्टन संतोष शिंदे यांची कन्या असून राष्ट्रीय स्तरावरील या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta