बेळगाव : सुळगे (येळ्ळूर) येथील द. म. शि. मंडळ संचलित नेताजी हायस्कूलमध्ये येळ्ळूर विभागीय माध्यमिक प्रतिभा कारंजी स्पर्धा शुक्रवार दि. 1 रोजी घेण्यात आल्या. त्यानिमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी भावकेश्वरी कृषि पत्तीन संस्थेचे चेअरमन श्री.रामचंद्रराव नंद्याळकर हे होते प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण यांनी केले. महात्मा फुले फोटो पूजन ग्रामपंचायत विकास अधिकारी श्री. दुर्गाप्पा तहसीलदार यांनी केले. सावित्रीबाई फुले फोटो पूजन सुळगे प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. संगीता नाईक यांनी केले. फाईल उद्घाटन श्री. संभाजी कुकडोळकर, श्री. विष्णू लोहार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून सुळगे ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. हनमंतम बोरक यांनी केले. दीप प्रज्वलन शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. बाचीकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे, श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर, श्री. व्ही. एल. पाखरे व श्री. गजानन कुकडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील बोलताना म्हणाले, प्रत्येक मुलांत सुप्तगुण असतात त्याला उत्तेजन मिळाल्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. संधीचा उपयोग करून शैक्षणिक विकास साधता येतो. त्यानंतर श्री. बी. बी. पाटील यांनी अध्यक्षीय विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. पी. कंग्राळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पी. के. झाजरी यांनी मांडले.
सीआरपी महेश जळगेकर यांनी शासकीय माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमाला येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन पाटील, श्री. एन. एफ. केंगेरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस एस केंगेरी, जे जे पाटील, सौ. एस वाय व्हॅडेकर, श्री. ए बी पाटील, श्री. एम एस वाडकर, श्री. एस एम कांबळे, श्री. एन एस कुकडोळकर यांनी परिश्रम घेतले. या प्रतिभा कारंजी स्पर्धा वैयक्तिक 14 आणि तीन सांघिक विभागात घेण्यात आल्या. एकूण सात माध्यमिक शाळांचा समावेश होता कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांकडून देणग्या देण्यात आल्या.
Belgaum Varta Belgaum Varta