
बेळगाव : रामतीर्थ नगर येथील एका खुल्या जागेत नवजात मृत पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर येथील भरवस्तीत आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती माळमारुती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.
रामतीर्थ नगर परिसरातील मोकळ्या जागेत रान व झुडपे वाढलेली आहेत याचाच फायदा घेत अज्ञातानी या ठिकाणी सदर अर्भक फेकून दिले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. माळमारुती पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली असून हे अर्भक कुणाचे आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta