बेळगाव : बेळगाव येथील शास्त्रीनगर येथे नुकतेच कोल्ह्याचे दर्शन झाल्यानंतर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी नगर परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून काल रात्री कोल्ह्याने दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला व तेथून पळ काढला. दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून दोघांना घरी पाठवले आहे. कोल्ह्याने हल्ला केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरक्षिततेसाठी तातडीने खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta