बेळगाव : के. एल. ई. होमियोपॅथीक मेडिकल कॉलेजच्या वतीने पी. यु. कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूल मुतगा येथे आरोग्य व स्वच्छता जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील होते.
प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य मुकुंद उडचनकर म्हणाले की, शाळा व महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. यासोबतच आपल्या शरिराची स्वच्छता देखिल राखली पाहिजेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थींनींना 12 ते 18 वर्षात अनेक शारिरीक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी आमच्या मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. शिल्पा पाटील, डॉ. इंदीरा कुलकर्णी, डॉ. राजकुवर देसाई यांनी विद्यार्थीनींना येणार्या समस्या, शारिरीक स्वच्छता, मानसिक संतुलन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिरीष पाटील, रेखा अंची, प्राचार्य एस. एस. जाधव, पी. यु. कॉलेज, हायस्कूल आणि प्राथमिक शाळेचा शिक्षवृंद्य, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. शिर्लेकर तर आभार आर. आय बडेघरवाले यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta