बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी भीमाशंकर गुळेद यांनी आज पदभार स्वीकारला. भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते एसपी डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवला. प्रसामाध्यमांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, आज मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध कारवाया मोडून काढून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसपी डॉ. संजीव पाटील यांनी खूप चांगले काम केले असून त्यांचे काम मी यापुढेही चालू ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta