बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली.
श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
निलजी येथे आर. एम. चौगुले यांचा भगवा फेटा आणि पुष्पहार घालून स्वागत ऍड. लक्ष्मण पाटील यांनी केले. यावेळी गोपाळ पाटील, नारायण गोमाण्णाचे, सुनील पाटील, किरण शिंदोळकर, रमेश मोदगेकर, किरण मोदगेकर, भरत पाटील, मदन बामणे, सागर कटगेण्णवर आदी उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे निलजी येथे श्रावणमास मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेवटच्या सोमवारी महाप्रसादचे आयोजन करण्यात येते. गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
नावगे येथील श्री रामलिंग मंदिरमध्ये शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बसवाणी सुतार. चंदु बेळगावकर. कृष्णा पाटील. विनायक यळ्ळूरकर. कार्लेकर आदी उपस्थित होते.