येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्यांची धडक मोहीम
बेळगाव : येळ्ळूर गावातील सर्व अंगणवाड्यामध्ये लहान मुलांना सरकारकडून येणारे धान्य एकदम खराब व सडलेले असल्याचे निदर्शनास आले. अंगणवाड्यामध्ये गुळ, डाळ, रवा, शेगां यामध्ये अळी झाल्या होत्या. हेच धान्य लहान मुलांना देण्यात येते. सरकार प्रत्येकवेळी मुलांना निरोगी राहा, स्वच्छ राहा, चांगला आहार खा, आरोग्य जपा असे सांगत असते पण अधिकारी मात्र अंगणवाडीच्या मुलाना सडलेले धान्य देतात. हा प्रकार या भागातील अंगणवाडी सुपरवायझर पार्वती हाणबर यांच्या निर्दशनास आणण्यात आला. अनेकवेळा गावातील नागरिकानी तक्रारी केल्या होत्या. ग्राम पंचायतने संबंधित खात्यावर योग्य कारवाई करावी, असे वरिष्ठांना खडसावून सांगण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते.