बेळगाव : कर्नाटक सरकारने येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने त्याच दिवशी बेळगाव येथे ’महामेळावा’ आयोजीत केला आहे. या महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. बैठकीचे आयोजन केले आहे.
श्रीचांगळेश्वरी मंदिर येथे होणार्या या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे चिटणीस एम. जी. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी बैठकीला वेळेवर हजर रहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
Check Also
शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Spread the love बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात …