बेळगाव : कावळेवाडी गावातील उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड (सातवी), पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर (नववी) यांनी नुकताच झालेल्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्याची 80 किलो वजन गटात राज्यस्तरीय निवड झाली. तो सध्या मठपती कुस्ती आखाडा सावगाव येथे सराव करीत आहे.
तसेच प्रेम यल्लापा बुरुड याची ऍथलेटिक्समध्ये चारशे मीटर व सहाशे मी.धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
प्रेम बुरुड गेली सात वर्षे सातत्याने धावण्याचा सराव करीत आहे. विविध ठिकाणी त्याने मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वीपणे जिद्द चिकाटी कायम ठेवली आहे.
यांची दखल सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांनी घेऊन प्रेम बुरुडसाठी दोन शूज जोड, ट्रॅकसूट, सॉक्स, सुनील धोंगडे यांच्याकडून आर्थिक सहकार्य घेऊन प्रेरणा दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नितेश पाटील साहेब यांच्या हस्ते या दोन गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या खेळाडूंना प्रोत्साहन देणारे वाय. पी. नाईक, संतोष दरेकर, यल्लापा बुरुड, भाऊराव कणबरकर, सुनील धोंगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वाय. पी. नाईक यांनी गावच्या वाचनालयतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील साहेब यांना श्रीभगवदगीता ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भविष्यात या खेळाडूंना शासकीय सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta