बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन तरुणींची सुटका केली.
कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दोन युवतींची सुटका केली आणि या छाप्यात सहभागी आरोपींना अटक केली. शिवशक्ती लॉजमध्ये बाहेरील राज्यातून तरुणींना आणून खासगी वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवले जात असल्याच्या माहितीवरून बेळगाव सीएनबी पोलिसांनी मोठी कारवाई केली. याप्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta