येळ्ळूर : सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सोसायटी म्हणून परिचित असलेल्या नवहिंद को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नामक वेबसाईट website:navhindcreditsocietyyellur.com चे उदघाटन ‘नवहिंद सोसायटी’चे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रारंभी व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून वेबसाईटसंबधीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर असि. जनरल मॅनेजर श्री. एन. डी. वेर्णेकर यांनी वेबसाईटची सविस्तर माहिती विशद केली.
याप्रसंगी श्री. दत्ता उघाडे, आनंद पाटील, प्रताप पाटील आदींची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमास नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, उदय जाधव, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, नीता जाधव, भीमराव पुण्याण्णावर, नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन दशरथ पाटील, व्हा. चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, व्हा.चेअरपर्सन सुरेखा सायनेकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा नम्रता पाटील, सेक्रेटरी संध्या हुंदरे, वसुली प्रमुख जे. एस. नांदुरकर, हेड ऑफिस मॅनेजर विवेक मोहिते, सर्व शाखांचे मॅनेजर, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते आणि सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
शेवटी उदय जाधव यांनी आभार मानले.