बेळगाव : सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे, जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे स्पर्धेत अधिकाऱ्यांच्या आणि आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे खेळाडू अस्वस्थ झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खेळाडू आणि प्रशिक्षकांना योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय उपचार न दिल्याने जिल्ह्याच्या विविध भागातील लोकांनी सार्वजनिक शिक्षण विभागाला खडसावल्याची घटना घडली आहे. कराटेपटूंसाठी योग्य खानपान उपलब्ध करून न देणाऱ्या सार्वजनिक शिक्षण विभागाला कराटेपटू आणि प्रशिक्षकांनी शिव्या घातल्याने हा खेळ अर्ध्यावरच आटोपल्याचे आपल्या मुलांसह येथे आलेल्या पालकांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta