येळ्ळूर : गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत बेम्को हायड्रोलिक्स लिमिटेड उद्यमबाग बेळगाव या कंपनीकडून देणगीदाखल मिळालेल्या सिरॅमिक ग्रीनबोर्डचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी कंपनीचे सीनियर मॅनेजर श्री. अरविंद पालकर, कंपनी सेक्रेटरी सौ. अमृता तरळे, फायनान्स मॅनेजर श्री. राजशेखर लक्षट्टी, कर्मचारी श्री. नागराज भेकणे, श्री. परशराम पाटील, सीआरपी श्री. महेश जळगेकर, शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षा सौ. रूपा धामणेकर, माजी एसडीएमसी अध्यक्ष श्री. उत्तम खेमनाकर, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शोभा निलजकर यांच्यासह सर्व आजी-माजी एसडीएमसी सदस्य, सदस्या, शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक वर्गातील 9 सिरॅमिक ग्रीनबोर्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शोभा निलजकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत सौ. ए. वाय. मेणसे यांनी केले. सूत्रसंचालन एस. बी. पाखरे यांनी केले तर आभार सौ. एस. एस. बाळेकुंद्री यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta