बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटना 11 जून 2023 रोजी बेळगाव येथे कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन आयोजित केली होती. त्यातील विजेत्यांना नियमानुसार वरील कारगिल मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी २१ कि.मी. कु-अमोल आमुणे (पंढरपूर). कु. सुरेश चाळोबा बाळेकुंद्री (बेकवाड-खानापुर). कु. आकाश देसुरकर (नंदगड-खानापूर). व १० कि.मी. कु. राहूल सुर्यवंशी (पंढरपूर). कारगिल येथे निवड करण्यात आले होते.
ह्या सरहद्द कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत कु. राहुल सुर्यवंशी या धावपटूने १० कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून विजय हाशील केला आहे. तसेच २१ कि.मी. स्पर्धेत कु. सुरेश चाळोबा बाळेकुंद्री (बेकवाड) याने 4 क्रमांक मिळवला आहे. तसेच कु. अमोल आमुणे (पंढरपूर) याने 5 क्रमांक मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली आहेत. या हिमालयीन मॅरेथॉनमध्ये अतिउंचीवर धावताना धावपटूंना फारच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे. तरी ह्या सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनमध्ये देश-विदेशातील 2500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगावच्या धावपटूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगावचे सर्व पदाधिकारी कारगील -लडाख येथे उपस्थित होते व ही त्याची वचनपूर्ती आपल्या खानापूर तालुक्यातील हितचिंतकच्या आशिर्वादाने व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सतिश जारकीहोळी साहेबांच्या मदतीने शक्य झाली.
कारगिलसाठी खेळाडूंना घेऊन सहभाग झालेले संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल देसाई, श्री. रवी बिरजे, सौ. राजश्री तुडयेकर, श्री. दामोदर कणबरकर, श्री. महादेव पाटील, श्री. विनोद गुरव, श्री. राजेश तुडयेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta