Saturday , March 7 2026
Breaking News

बस झाडाला आदळून 20 विद्यार्थी जखमी

Spread the love

 


रामदुर्ग : बिजगुप्पी गावात समोरचा एक्सल तुटल्याने बस उलटल्याने २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. ही बस चिक्कोप्पा गावातून रामदुर्गकडे जात होती आणि त्यात ५० हून अधिक प्रवासी होते. रामदुर्गकडे जाणारी बस पुढे जात असताना बसचा एक्सल तुटला गेला. एक्सलेटर कट होताच बसचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली आणि तिथेच पलटी झाली. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये अनेक विद्यार्थी होते. गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात दाखल केले. अनेक लोक जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. याप्रकरणी कटकोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *