बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्यासंदर्भात बैठक झाली असून हजारोच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहाण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
या बैठकीचे अध्यक्ष शांताराम कुगजी अध्यक्ष येळ्ळूर विभाग समिती येळ्ळूर हे होते. प्रास्ताविक येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस प्रकाश आष्टेकर यांनी केले.
भारताचे पहिले सीडीएस प्रमुख जनरल बिपीन रावत त्यांचे सहकारी आणि गावातील निधन झालेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रारंभी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, येळ्ळूर सिमाभागाचा केंद्रबिंदू आहे. येळ्ळूर गावच्या जनतेने सिमासत्याग्रह केला व महाराष्ट्र राज्य फलक लाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. महामेळाव्याला पण जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहतील आणि आपला मराठी बाणा दाखवून देतील असा विश्वास व्यक्त केला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी येळ्ळूरची जनता ज्या ज्या वेळी सीमाप्रश्नासाठी आंदोलने त्या त्या वेळी सैनिकासारखे उभे राहिली. 13 डिसेंबर रोजी होणार्या मेळाव्याला सुध्दा हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्त्यांनी सामील व्हावे, असे आवाहन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी गरीब मराठी युवकांना छोटे मोठे उद्योग करण्यासाठी आर्थिक सहाय्य बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करत असतो व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून अनेक कामगारांचे कामगार कार्ड करून देत सरकारी निधी नागरिकांना उपलब्ध करुन दिला आहे. ज्यांचे कार्ड नसेल त्यांनी रंगुबाई पॅलेसमध्ये जाऊन करुन घ्यावीत, असे आवाहन केले.
यावेळी मनोज पावशे, एम. जी. पाटील, संतोष मंडलिक आदींनी आपले विचार मांडले.
येळ्ळूर गावच्यावतीने ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील यांनी मेळाव्याला पाठिंबा दिला. बैठकीला रावजी पाटील, महेश जुवेकर, विकास कलघटगी, ग्राम पंचायत सदस्य, गावातील समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे आभार दुद्दाप्पा बागेवाडी यांनी मानले.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …