बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे बेळगावातील अनुभव मंडप मॉडेलच्या बांधकामासाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे.
बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
मंडप उभारणीसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी केली आहे. बेळगावच्या राणी चन्नम्मा सर्कल येथे वीर राणीचा इतिहास, रायण्णा सर्कल आणि अशोका सर्कलच्या सुशोभीकरणासाठी विशेष अनुदान देण्याची विनंती करून या चौकांच्या विकासासाठी नियोजन करण्यासाठी नगरविकास विभागाला तातडीने सूचना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बेळगाव शहराच्या सुशोभिकरणाचा मुद्दा करत आमदार बेनके यांनी सरकार दरबारी अनेक मागण्या लाऊन धरल्या आहेत त्यात वरील चौकांच्या सुशोभीकरणाचा मुद्दा सामील आहे.
Belgaum Varta Belgaum Varta