
बेळगाव : नवहिंद मल्टीस्टेट सोसायटी व दौलत सहकारी साखर कारखाना तारण गहाण कर्जाचा एक दशकाहून अधिक काळ चाललेला सर्वोच्च न्यायालयातीन लढा ‘नवहिंद सोसायटी’ने जिंकल्याने सहकार क्षेत्रात नवहिंदचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुरेश वाबळे यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित केलेल्या मल्टीस्टेट फेडरेशनच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी सीमाभागातील सहकार क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती विशद केली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवहिंद को-ऑप. सोसायटीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खास गौरव करण्यात आला.
प्रारंभी श्री. वर्पे यांनी जमाखर्च सादर करून मंजुरी मिळविली. यावेळी थकीत कर्ज वसुलीसाठी राज्यातील सहकारी पतसंस्थाप्रमाणेच सर्व मल्टीस्टेट सोसायट्यानाही 101 सारख्या कडक कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी लावून धरणार असल्याचेही सुरेश वाबळे यांनी सांगितले.
या सर्वसाधारण सभेस नवहिंदचे व्हा. चेअरमन अनिल हुंदरे, शिवाजी सायनेकर, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, फेडरेशनचे संचालक प्रा. व्ही. एस. अंकलकोटे, धनंजय तांबेकर, शिवाजीराव कपाळे, कडुभाऊ काळे, आदिनाथ हजारे, डाॅ. जयप्रकाश निंबाळकर आणि राज्यातील 35 मल्टीस्टेट सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta