Tuesday , March 3 2026
Breaking News

एंजल फाउंडेशनतर्फे 11 ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : कलागुणांना वाव मिळावा आणि खेळातून त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनावे हा हेतू घेऊन एंजल फाउंडेशनने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मंगळागौर ही श्रावण महिन्यात साजरी करण्यात येते. मात्र श्रावणात उपवास सण उत्सव वार येत असल्याने महिलांना यातून म्हणावा तसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील कलागुण बाहेर यावे त्याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी ऑक्टोबर 11 रोजी मंगळागौर स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रथम क्रमांकाला 10000 द्वितीय क्रमांकाला 7000 आणि तृतीय क्रमांकाला 5000 रुपये प्रकाराचे बक्षीस दिले जाणार आहे. याकरिता प्रवेशफी फक्त 500 रुपये ठेवण्यात आली असून महिलांनी एंजल फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेची वेळ : 3 -6 पर्यंत

स्पर्धेचे ठिकाण : जैन दिगंबर बोर्डिंग हाॅल मानिकबाग, ओल्ड पी बी रोड श्री रेणुका देवी मंदिर मागे बेळगाव.
अधिक माहितीसाठी संपर्क : माया 7676826871,
कमल 9686587421

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *