
बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृह, बेंगळुरू कारागृह उडवून देण्याची धमकी देणारे फोन कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष यांना आल्याची माहिती मिळाली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिंडलगा मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, निवासी घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.
कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष यांनी याबाबत बेळगाव ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत अज्ञात व्यक्तीने हिंडलगा कारागृहात दंगल घडवून आणण्याची तसेच हल्ला करण्याची धमकी दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta