
बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ कावळेवाडी यांच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शौर्य व शक्ती, समृद्धी, शांतीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा नवरात्रोत्सव गावात गेली दहा वर्षे सातत्याने उत्साहात संपन्न होतो.
माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहनराव मोरे यांच्या प्रेरणेतून या ल विधायक उपक्रमामुळे तरुण वर्गात ऐक्याची भावना वाढीस लागते. या वर्षी मुहूर्तमेढ कृष्णकुमार गावडे यांच्या हस्ते रोवली गेली. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व गावातील सांप्रदायिक भजनी मंडळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta