
बेळगाव : बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व सुरवात झाली आहे. सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गावातील कलमेश्वर बसवाणा मंदिरापासून दौडीला सुरवात झाली. गावातून दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिर, ब्रम्हलिंग मंदिरकडे जाऊन ध्येय मंत्र म्हणून परत कुडची गावात आली. बसवण कुडची दुर्गामाता दौडीचे हे 19 वे वर्ष आहे.
“शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रीत- विजयादशमी पर्व महोत्सवात ” संपूर्ण महाराष्ट्र तसेच अन्य प्रांतात दुर्गामाता दौडने विशाल रूप धारण केलेले असून लाखों युवक- युवती माथेवर भगवा फेटा धारण करून, हाती भगवा ध्वज, पांढरा कुर्ता परिधान करून तलवारी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज- भारतमातेचा जयजयकार करित भगवा ध्वजाने, भगवा पताका, रांगोळी घातलेल्या रस्त्यावर, हिंदु धर्माचा जयजयकारात नागरिकांकडून होत असलेल्या फुलांच्या वर्षात न दमता न थकता हसत खेळत उत्साहात धावत दौड होत आहे. देशभक्तीने ओत-प्रोत भरलेल्या विशाल जागृतावस्थेत असलेल्या हिंदु समाजाचे दर्शन पहावयास मिळत आहे.
निलजीतही कुडचीच्या दौडीला चांगला प्रतिसाद मिळाला. दौडीला गावातील मुली, मुलांचा तसेच आभालवृद्धाचा प्रचंड संख्येने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta