
बेळगाव : स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा नेगील योगी रयत संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.
स्वामिनाथन आयोग अंमलात आणण्यात राज्य सरकार चालढकल केली जात आहे. त्यामुळे तातडीने स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा; अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमदार राजू सेट, आमदार बाबासाहेब पाटील देखील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta