
येळ्ळूरमध्ये नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन
येळ्ळूर : वारकरी सांप्रदाय जगात श्रेष्ठसंप्रदाय आहे, संत तुकाराम महाराजांनी व्यसनमुक्त समाजासाठी कार्य केले, त्याचप्रमाणे नेताजी युवा संघटनेच्या वतीने सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी या ठिकाणी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे. विठोबा हा गरिबांचा देव आहे, युवकांना चांगले संस्कार व चांगल्या संस्कृतीचे आचार विचार देण्यासाठी अशा संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करणे खूप गरजेचे आहे. शून्यातून ब्रह्मांड निर्माण
करणाऱ्या नेताजी युवा संघटनेच्यावतीनेे आयोजित भजन स्पर्धा समाजासाठी व युवकासाठी एक वेगळी दिशा देईल यात शंका नाही. अशा स्पर्धांची आमच्या समाजाला आज गरज आहे, असे विचार माजी विधान परिषद सदस्य व के.एल.ई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित नेताजी मराठी सांस्कृतिक भवन या ठिकाणी संगीत भजन स्पर्धेच्या निमित्ताने त व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे हे होते. संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपप्रज्वलन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, उद्योजक राजेंद्र मुतगेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. तर नेताजी प्रतिमेचे पूजन माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या हस्ते झाले, ज्ञानेश्वरर प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांच्या हस्ते झाले, तुकाराम प्रतिमेचे पूजन महादेव कुगजी यांच्या हस्ते झाले, सरस्वती प्रतिमेचे पूजन अभियंते हणमंत कुगजी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष
दुधाप्पा बागेवाडी, शेतकरी सोसायटीचे चेअरमन दीपक कर्लेकर, व्हाईस चेअरमन श्रीधर कानशिडे, उद्योजक पुंडलिक पावशे, मार्कंडेय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब भेकणे, सुनील अष्टेकर, कवटगीमठ सोसायटीचे चेअरमन शरद कवटगीमठ आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मुक्ता लोहार हिने गणेश वंदना गायिली. नेताजी युवा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील यांनी केले, पाहुण्यांचा परिचय नेताजी युवा संघटनेचे सेक्रेटरी के. एन. पाटील यांनी करून दिला. यानंतर माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी शिफळ वाढवून संगीत भजन स्पर्धेचेचे उद्घाटन केले. यावेळी नेताजी युवा संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक अनिल हुंदरे, वनिता अतिवाडकर, व सुरेखा पाटील यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी विद्यालयचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र मुतगेकर, मार्कंडेयचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील यांनी नेताजी युवा संघटनेच्या कार्याचा आढावा घेत, अशा संगीत भजन स्पर्धांची आपल्या समाजाला गरज आहे असे उद्गार काढले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुख्याध्यापक महेश सडेकर व विजय बांदीवडेकर यांनी काम पाहिले. नेताजी युवा संघटनेचे कार्यकर्ते, नेताजी सोसायटीचे संचालक, सल्लागार, कर्मचारी व ग्रामस्थ तसेच वेळगाव शहर व तालुक्यातील अनेक भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण 25 मंडळांनी भाग घेतला असून स्पर्धा सलग दोन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी सोसायटीचे संचालक संजय मजुकर यांनी केले. तर आभार नेताजी सोसायटीचे उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta