Thursday , December 11 2025
Breaking News

संजय बेळगावकरांच्या आवाहनाला रमाकांत कोंडुसकर यांचे परखड प्रत्युत्तर

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर महापालिकेत सुरू झालेले वर्चस्वाचे राजकारण प्रत्येक दिवशी नवनवे वळण घेत आहे.
त्यातच आज बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी, मंत्री जारकीहोळी यांनी बुडाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल एकाबाजूला चौकशीचे मी स्वागत करतो. मात्र मी मराठा समाजाचा असल्यामुळे त्यांनी हा प्रकार सुरू केला आहे.तसेच शहराच्या महिला महापौर शोभा सोमनाचे यादेखील मराठा समाजाच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा प्रकार सुरू केला आहे. याचा मी निषेध करीत आहे, असे संजय बेळगावकर यांनी म्हटले.
संजय बेळगावकर यांच्या विधानाला श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आक्षेप घेतला आहे. बेळगाव शहर आणि परिसरात मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होत आहे. मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर खोटे खटले दाखल होत आहेत. या विरोधात मराठी भाषिक सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाप्रसंगी संजय बेळगावकर कुठे होते?
त्यांच्या बुडा अध्यक्ष कारकीर्दीत शिवसृष्टीतील कामाला वेग आला. मात्र याच शिवसृष्टीच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण देण्यात आले नाही. मराठी समाजावर झालेला अन्याय त्यांना का कळला नाही. बेळगावकरांना महापौरांचा कळवळा येतो. मात्र 138 सफाई कामगारांवर झालेल्या अन्यायावर मात्र ते बोलत नाहीत. संजय बेळगावकर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्या पाठोपाठ आता कन्नड भाषा न जाणणाऱ्या महापौरांनाही अडचणीत आणले जात आहे. बेळगावकरांनी जर भ्रष्टाचार केला नसेल. याचा अर्थ बेळगावकर आणि महापौरांना अडचणीत आणणे असाच होतो. या दोघांना मराठी भाषिक असल्याने अडचणीत आणण्याचे राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. असा टोलाही रमाकांत कोंडुसकर यांनी लगावला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोव्याच्या शेकोटी साहित्य संमेलनात बेळगावचे पत्रकार, कवी आमंत्रित

Spread the love  बेळगाव – गोव्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दि. 13 व 14 डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *