Wednesday , December 10 2025
Breaking News

यल्लम्मा देवस्थान परिसरात चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love

 

बेळगाव : सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लमा देवी मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे शहरातील महिला भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

माजी नगरसेविका सुधा भातकांडे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी शहरातील महिला भाविकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याची आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी प्रमोदा हजारे यांनी अधिकाऱ्यांना निवेदनातील मागण्यासंदर्भात माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी नगरसेविका सुधा भातकांडे म्हणाल्या की, सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान परिसर स्वच्छ ठेवावा. जोगनभावी येथे आंघोळ केल्यानंतर त्या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी खोल्यांची सोय केली जावी. श्री यल्लमा डोंगरावर जिल्ह्यासह परगावातून असंख्य भाविक येत असतात. तेंव्हा त्या ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांसाठी दर्शनाची वेगवेगळी सोय केली जावी. देवदर्शनासाठी जी सोय करण्यात आली आहे.
तथापि त्या ठिकाणी मोठी गर्दी होऊन दर्शनासाठी इतका विलंब लागतो की बरेच जण भोवळ येऊन पडतात. तेंव्हा आमची जिल्हाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या या मागण्या येत्या पौर्णिमेच्या आत पूर्ण न झाल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडू.

यावेळी श्रीमती सुनीता सुभेदार, श्रीमती अनुराधा सुतार, वर्षा डोकणेकर, संध्या वर्पे, गीता हलगेकर, वर्षा आजरेकर, निकिता मनवाडकर, अश्विनी हलगेकर, मालू शहापूरकर, पूजा जाधव, अनिता भोसले, प्रिया माळवी, जयश्री रेवाळे, अश्विनी श्रेयकर आदी महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *