चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्यावतीने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
येळ्ळूर : मराठी शिक्षक हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक असतात. पुस्तकही शिक्षकांच्या जडणघडणीसाठी मार्गदर्शक असतात. शिक्षकांनी वाचनाचा छंद जोपासावा. शिक्षक हाच विद्यार्थी, समाज व देश घडवणारा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकाने काळानुरूप बदले पाहिजेत, शिक्षणातले नवनवीन बदल अनुसरले पाहिजेत, कोरोना काळापासून सुरू झालेले ऑनलाईन शिक्षण पद्धत आजही मोठ्या प्रमाणात शिक्षकाने वापरले पाहिजेत. आजच्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीचे शिक्षण दिले पाहिजेत. आम्ही अपडेट झालो नाही तर आऊटडेटेट होईन म्हणून तंत्रज्ञान आत्मसात करा, असे उद्गार प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले.
शुक्रवार दिनांक 31/ 10/2023 रोजी हे चांगळेश्वरी हायस्कूल येथे आयोजित श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या विविध शाखातील शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक श्री. वाय. एन. मजूकर होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून समाजाला मार्गदर्शन करावे आणि आदर्श समाज घडवावा असे संबोधित केले. संस्थेचे सचिव प्रसाद मजूकर यांनीही यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमाला मार्गदर्शक तज्ञ म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. मायाप्पा पाटील होते तसेच संस्थेचे सचिव प्रसाद मजूकर, संचालिका सौ. कांचन मजूकर, उपाध्यक्ष श्री. दौलत कुगजी, चंद्रकांत दादा पाटील, नरेंद्र मजूकर, मारुती कुगजी, महादेव कुगजी तसेच संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील, जे. एम. पाटील, आर. बी. पाटील, ए. एम. पाटील, एस. एम. येळ्ळूरकर, आय. बी. राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर यांनी केले. यानिमित्त संस्थेच्या जडणघडणीत सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेतील सर्व शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. बी. कांबळे यांनी तर आभार श्री. एल. एस. बांडगे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.