
बेळगाव : बिजगर्णी (बेळगाव) येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे. नुकताच गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात ग्रामस्थ मंडळाची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर उपस्थित होते.
बिजगर्णी, कावळेवाडी अशा दोन गावांची ही लक्ष्मीची यात्रा एकत्रितपणे होणार आहे.
बिजगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात दोन गावांतील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ही यात्रा 16 एप्रिल रोजी करण्याचे एकमताने ठराव संमत करून निश्चित करण्यात आले.
ही यात्रा तब्बल तीस वर्षांनंतर भरवली जात आहे. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे
श्री लक्ष्मी देवी भक्तांना पावणारी, मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून श्रद्धाळू भक्त जनांच्या मनात कोरलेली आहे.
अशा या श्रद्धेने मनाला शांती समाधान लाभते. तीस वर्षे नंतर भरवण्यात येणारी ही यात्रा आनंद देणारी आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्वानुमते यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यात्रोत्सव व्यवस्थित यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta