अरविंद संगोळी यांची माहिती
बेळगाव – लायन्स इंटरनॅशनलची स्थापना 1917 मध्ये झाली होती. जगभरात लायन्सच्या वतीने सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बेळगावत 1974 साली स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीचा सुवर्ण महोत्सव 18 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीचे अध्यक्ष अरविंद संगोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना संगोळी म्हणाले, लायन्स क्लब ऑफ टिळकवाडी वतीने गेली पन्नास वर्षे सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. लायन्स वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे कार्य अखंडीतपणे सुरू आहे. आत्तापर्यंत तीस हजार नेत्र रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. लायन्स क्वेस्ट कार्यक्रमांतर्गत 350 शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात लायन्स क्लब ऑफ टिळकवाडी वतीने गरजू गरिबांना 75 लाख रुपयांचे आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे. मतिमंद मुली मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि परिसरात 25 बस निवारे बांधण्यात आले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मोफत चिकित्सा शिबिरे आयोजित केले जात आहेत. प्रत्येक वर्षी 4000 हून अधिक रक्तांच्या बाटल्या गोळा करून नियमित रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. टिळकवाडी मंडोळी रस्ता येथे लायन्स म्हणून उभारण्यात आले आहे, असेही संगोळी यांनी स्पष्ट केले.
लायन्सचे माजी प्रांतपाल श्रीकांत शानभाग म्हणाले, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गांधीनगर जवळील पै रिसॉर्ट येथे सुवर्ण महोत्सव कार्यक्रमा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अगरवाल यांच्यासह, माजी आंतरराष्ट्रीय संचालक के वमसीधर बाबू, मल्टिपल कॉन्सिल चेअरमन राजशेखर बी. एस., प्रांतपाल जोस फ्रान्सिसको ऐरी यांच्यासह अन्य मान्यवर ही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर व्ही. आर भांदुर्गे, सेक्रेटरी मल्हारी दिवटे, मधुकर मोटार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta