बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले होते. स्थानिक अधिकारी दखल घेत नसल्याने दिनांक ०५/११/२०२३, म. ए. युवा समितीच्या वतीने बेंगळूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवालयाला पत्रव्यवहार करून मच्छे वाघवडे दुरुस्ती संदर्भात आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली होती. त्यांनतर बेळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मच्छे – वाघवडे दुरुस्ती संदर्भात म. ए. युवा समिती केलेल्या तक्रारीची दखल घेत, मच्छे वाघवडे रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात केंद्रीय निधी योजने अंतर्गत डांबरीकरणासाठी कृती आराखडा सादर करण्यात आला आहे व त्याला मंजुरी मिळाल्यानंतर मच्छे-वाघवडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने म. ए. युवा समितीला दिले आहे
Belgaum Varta Belgaum Varta