विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या. जाहीर झालेल्या निकालानुसार पक्षाला दोन ठिकाणी बसला धक्का आहे. परंतु एकूणच परिणाम समाधान कारक आहेत. आगामी काळात पक्षाला आणखीन बळकट बनवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील. बेळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत यश-अपयशाची समीक्षा केली जाईल. पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती दिली जाईल. पक्षात सर्वजण संघटित होती अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवाराच्या अपयशाला आम. रमेश जारकीहोळी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. त्यांच्या विरोधात पक्ष कारवाई करणार का या प्रश्नाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी बगल दिली.
