बेळगाव : गेल्या काही महिन्यापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले अशोक बिडीकर वय 60 मूळ गाव इचलकरंजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी त्यांचा मृत्यू झाला ही माहिती निराधार केंद्रातील संयोजक रावसाब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांना कळविले. यानंतर माधुरी जाधव यांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करून स्वतः त्यांनी अशोक यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अशोक हे प्राईम ग्रुप या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. यावेळी कंपनीचे मालक संकेत पाचुपते आणि आश्रममधील सदस्य उपस्थित होते.