Saturday , October 19 2024
Breaking News

सामाजिक कार्यकर्ते पी. जे. घाडी राष्ट्रीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

शिक्षक विकास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

बेळगाव : शिक्षक विकास परिषदेचे 27 वे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोव्यातील शिरोडा येथे पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आनंदनगर, वडगांव-बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाण्णा घाडी यांना अधिवेशनात राष्ट्रीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक विकास परिषदेच्या वतीने नॅशनल अवॉर्ड टीचर्स असोसिएशन गोवा, ज्ञानदीप मंडळ आणि शिक्षक विकास प्रतिष्ठान गोवा, डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर गव्हमेंट ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 9 डिसेंबर रोजी शिरोडा येथील शिवनाथ सभागृहात अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी गोव्याच्या शिक्षण विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर उदय गावकर, कला आणि सांस्कृतिक विभागाचे डेप्युटी डायरेक्टर श्री. दिनेश पवार, गोमंत साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वनस्कर, पुण्याचे डॉक्टर वाय. एन. साळवे, बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या अखिला पठाण तसेच गोव्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरज नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या शिक्षक प्रतिनिधींचे राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रम पार पडले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या समारोप समारंभासाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत काकतीकर (बेळगाव), डॉक्टर देवकर दिनेश गौर (गुजरा), प्राध्यापिका श्रीमती अनुसयाबेन नजूल्ला (गुजरात), स्नेहा गावकर (गोवा), डॉ. वाय. एन. साळवे (पुणे), अखिला पठाण (बेळगाव) आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. देवकर दिनेश गौर (गुजरात) लिखित पुस्तकाचे प्रकाशन, परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण पालक, त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना प्रमुख अतिथींच्या हस्ते दि. 10 डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आले. बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते पी. जे. घाडी यांना समाजात बजावीत असलेल्या उल्लेखणीय समाज कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच इतरही सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाच्या समारोपाला भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. पांडुरंग बखले यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले. गोपाळ गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *