परिवहन मंत्री श्रीरामलूची माहिती
बेळगाव (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळात राज्यातील बस सेवेवर परिणाम झाला. कोरोना संक्रमण कमी होऊ लागल्यानंतर, राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्रीरामलू यांनी विधानसभेत बोलताना दिली.
आज बुधवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात आमदारांनी आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीरामलू पुढे म्हणाले, केंद्र सरकारने पंधरा वर्षावरील वाहने स्क्रॅप करण्याची सूचना केली आहे. राज्यात नऊ लाख किलोमीटर अंतर कापलेल्या बसेस स्क्रॅप करण्यात येत आहेत. कोरोना काळात राज्यातील बस सेवा खंडित झाली होती. कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील बस सेवा पूर्ववत प्रयत्न केले जात आहेत.
इंधनाचे दर वाढले आले असले तरीही बस तिकिटांचे दर वाढविण्यात आलेले नाहीत. कोरोना आणि वाढत्या इंधन दरामुळे परिवहन महामंडळाचे चार विभाग आर्थिक तोट्यात आहेत. अशावेळी प्रवाशांवर भुर्दंड न लादता तूट भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दुर्गम भागात मिनी बस सेवा तसेच विद्यार्थ्यांना 60 किलो मीटर अंतराची प्रवास मर्यादा शंभर किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असेही श्रीरामलू यांनी स्पष्ट केले.
