Sunday , July 26 2026
Breaking News

शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा

Spread the love

राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना
निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्‍या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्‍यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. नदीकाठावरील शेतातील पिके महापूर व अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे अनेक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. पण आजतागायत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सर्व समस्या मांडण्यासाठी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवण्यात येणार आहे. विधानसभा समोर चालू मोर्चा काढला असून त्यासाठी निपाणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन चिक्कोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
विधानसभेला घेरावो घालण्यासाठी रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते निपाणीमार्गे बेळगावला जात होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी येथील अक्कोळ रोडवर निपाणी मतदारसंघातील रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानंतर धर्मवीर संभाजीराजे चौक, साखरवाडी, नगरपालिका मार्गे तहसीलदार कार्यालयाजवळ मोर्चा नेण्यात आला. तेथे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना राजू पोवार व कार्यकर्त्यांच्या हस्ते शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांच्या विविध घोषणांनी तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून गेला. तहसीलदार भस्मे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष आय. एन. बेग, ग्रामिण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, तालुका कार्याध्यक्ष प्रविण सुतळे, रमेश पाटील, विवेक जनवाडे, कलगोंडा कोटगे, श्रीकांत संकपाळ, तेजस ढाले, बाळासाहेब पाटील, सुनील गाडीवड्डर, मलगोंडा मिरजे, बसगोंडा मंगावते, प्रशांत परीट, अमोल पाटील, काकासाहेब जाधव, सागर सादळे, बाबासाहेब पाटील, संजय जोमा, सुखदेव मगदूम, अनंत पाटील, नारायण पाटील, महेश पाटील, सुनील गायकवाड, संजय पाटील, महेश जनवाडे, सुभाष देवर्षी, नानासाहेब कुंभार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *