Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगावातील कॉलेज रोडवर भीषण अपघातात युवक जागीच ठार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील कॉलेज रोडवर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. कॉलेज रोडवर सरदार हायस्कूलच्या समोर आज सोमवारी पहाटे भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पंकज नामक युवक रस्त्यावर उडून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मृत पंकज २४ वर्षांचा असून तो मच्छे गावचा रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अपघातस्थळी रस्त्यावर रक्त सांडून भयाण दृश्य निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच खडेबाजार आणि वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ऍम्ब्युलन्समधून पंजकच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *