Tuesday , March 3 2026
Breaking News

प्रेम प्रकरणावरून नावगे गावात दोन गटात हाणामारी

Spread the love

 

बेळगाव : एका मुलीसाठी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावात घडली. प्रेमप्रकरणावरून दोन गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचाच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना काल मध्यरात्री नावगे गावात घडली असून गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रेमाच्या कारणावरून दोन गावातील तरुणांमध्ये भांडण झाले. बेळगाव शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असलेला नावगे गावचा युवक आणि एका गावातील युवतीमध्ये प्रेमप्रकरण सुरु होते. यामुळे बहाद्दरवाडी गावाच्या विद्यार्थ्यांनी नावगे गावाच्या युवकाला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पंचाच्या घरावर मध्यरात्री त्या मुलांनी नावगे गावात घुसून दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.

गावातील चार घरांवर दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी नावगे येथे घडली. मुखवटा घातलेल्या मुलांच्या टोळीने घरात घुसून तोडफोड केली. यावेळी गावातील पंचांनी मध्यस्थी करून भांडण मोडीत काढले. काल गावात घुसलेल्या बहाद्दरवाडी येथील तरुणांचा उपद्रव पाहून गावकरी हैराण झाले आहेत. सोमवारी दोन्ही बाजूंमधील वाद वाढत जाऊन हाणामारी होऊन प्रकरणाने हिंसक रूप धारण केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात आहे. बेळगाव ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *