बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्या बेळगाव जिल्हा व तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
सत्कारावर प्रतिक्रिया देताना अनिल बेनके म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची मला जाणीव आहे. त्यादृष्टीने मराठा समाजाला आवश्यक आरक्षण व आवश्यक जागा देण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
या प्रकरणी डॉ. सोनाली सरनोबत, डी. बी. पाटील, संजय भोसले, रोहन कदम, सतीश बाचीकर, डॉ. समीर सरनोबत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.