
बेळगाव : नंदगड येथे 17 जानेवारी रोजीपासून सुरु होणाऱ्या संगोळ्ळी रायण्णा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा ज्योतीचे बेळगावात आज मान्यवर व अधिकाऱ्यांनी स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या स्मरणार्थ खानापूर तालुक्यातील नंदगड येथे 17-18 जानेवारी रोजी होणाऱ्या संगोळ्ळी रायण्णा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा ज्योतीचे बेळगावात आज शानदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त चन्नम्मा चौकात आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी ज्योतीचे स्वागत करण्यात आले. आ. राजू सेठ यांनी चेन्नम्मा चौकातील वीर राणी चेन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मान्यवरांनी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच काही काळ मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बेळगावमध्ये आज दाखल झालेली संगोळ्ळी रायण्णा वीरज्योत जिल्ह्याच्या विविध भागात फिरणार आहे. यावेळी आमदार राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापालिका सत्तारूढ गटनेते राजशेखर डोणी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांच्यासह नगरसेवक व अनेक अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta