Wednesday , March 4 2026
Breaking News

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : पाचहून अधिक दशके बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तुकाराम बर्डे यांचे रविवार दि. 14 जानेवारी रोजी नेहरू नगर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.

निधन समयी ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, सहा बहिणी, पुतणे आणि नातेवाईक असा परिवार आहे.

रविवारी सायंकाळी 7 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बेळगाव येथील पत्रकारांच्या जुन्या फळीतील अग्रणी नाव म्हणून प्रशांत बर्डे यांना ओळखले जाते. त्यांनी सुरुवातीला इतर दैनिकात तसेच बरीच वर्षे दैनिक पुढारीत केलेल्या पत्रकारितेची नोंद आजही घेतली जाते. त्यांच्या बातमीदारीची, लेखांची चर्चा आजही होताना दिसते. राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. असे पत्रकारिता क्षेत्रात बोलले जाते.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकार क्षेत्राची न भरून येईल इतकी हानी झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *