
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयांनी मंदिराची स्वच्छता करण्याची विनंती केली आहे त्यानुसार नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत त्यांनी हिंडलगा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन स्वच्छता राबविली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील काळूराम मंदिरात जाऊन स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर भाजपचे व नेते मंदिरात जाऊन स्वच्छता करत आहेत. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये देखील हिंडलगा येथे डॉ. सोनाली सरनोबत यांनी मंदिरात जाऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
बेळगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, मालू चौगुले, राजश्री अगसगेकर, मंजुळा पाटील, माधुरी अगसगेकर, वनिता बेळगुंदकर, शोभा बेळगुंदकर, आशा कुंडेकर, अक्षय अगसगेकर, मंदार पाटील, विद्याधर पाटील, शिल्पा शिंदे, अनिता शिंदे यांच्यासह हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta