Friday , April 18 2025
Breaking News

बार असोसिएशनच्या मुलभुत सुविधांसाठी 2 कोटी रुपये मंजुर करा : आमदार अनिल बेनके

Spread the love

बेळगांव (वार्ता) : दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी राज्य कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्यासोबत आमदार अनिल बेनके यांनी बार असोसिएशनला भेट दिली. वकील व बार असोसिएशनच्या मागणीप्रमाणे बेळगांव कोर्ट आवारात मुलभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 2 कोटी अनुदान मंजुर करावे, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी केली.
या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, मीसुद्धा वकील असून बेळगांव कोर्ट आवार व बार असोसिएशनमध्ये मुलभुत सुविधा आवश्यक आहेत. माझ्या सहकारी वकीलांच्या मागणीप्रमाणे विकासकामे आवश्यक आहेत. लवकरात लवकर 2 कोटी रुपये अतिरिक्त अनुदान मंजुर करावा, अशी आमदार अनिल बेनके यांनी मागणी केली. या संदर्भात आमदार अनिल बेनके यांच्यासमवेत बेळगांव बार असोशिएशन सदस्य व वकील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *