
बेळगाव : जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्याला अनुसरून सर्वत्र स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जात आहेत.
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनिल चौगुले आणि अनंत लाड यांच्या पुढाकाराने मंगळवारी व बुधवारी मारुती मंदिर आणि परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संपूर्ण मंदिर आणि परिसराची झाडलोट, साफसफाई व धुण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुनिल चौगुले, अनंत लाड यांच्यासह योग गुरु शंकरराव कुलकर्णी, राजेश गोजगेकर, मधु गुरव, बाळू पाटील, चेतन चौगुले, उदय अष्टेकर, मंजुनाथ शेठ, भाऊराव मंडोळकर, हिरालाल पटेल, माणिक कडबी, किशोर गरगट्टी, सुधीर मुनवळळी, अरुण कडोलकर व संदिप मोरे आदींनी भाग घेतला
Belgaum Varta Belgaum Varta